अनिल ठाणेकर
ठाणे : परभणी ते मुंबई या लाँग मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी या लॉंग मार्चमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन ‘माकप’ ची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे, असे आवाहन माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.
परभणीतील संविधानाच्या उद्देशिकेची नासधूस करण्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ झालेल्या जन आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या मनुवादी पोलीस यंत्रणेने तेथील संविधानप्रेमी नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. पोलिसांनी कस्टडीत केलेल्या योजनाबद्ध अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या उमद्या विद्यार्थ्यांची हत्या झाली. दलित नेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूलाही मनुवादी पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने तातडीची आर्थिक मदत म्हणून सूर्यवंशी कुटुंबाला तीन लाख आणि वाकोडे कुटुंबाला एक लाख रुपयांची अल्पशी मदत केली आहे. महाराष्ट्राच्या मनुवादी शासनाने केलेल्या अत्याचाराच्या बाबतीत न्याय मिळावा म्हणून निघालेल्या परभणी ते मुंबई या लाँग मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देत आहे, असे डॉ. उदय नारकर यांनी सांगितले.