कल्याण : मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा सांगता सोहळा २८ जानेवारी रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विदयार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इतर महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातील विदयार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धा, लावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी एक झाड एक कविता, पथनाटय, सोनावणे महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी अक्षर दिंडी, मंगळागौर, प्रगती महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी शिवचरित्र असे बहारदार कार्यक्रम सादर केले.

हा कार्यक्रम बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विदयार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *