रमेश औताडे

मुंबई : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेने सलग २५ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

नवी मुंबई विभागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ११० रक्तदात्यानी  रक्तदान केले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *