भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च
मुंबई : भांडुपच्या येथील रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका चार  (४) एक  महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.  भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले.
यात “हेवी ड्युटी क्रेन्स” आणि “१२ मल्टी-अ‍ॅक्सल” वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले.
या कामासाठी मुंबई महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत “एमएमआरडीए”नेही उत्कृष्ट समन्वय साधला आहे.
उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले.       या मोहिमेसाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. नागरिकांना अत्यल्प त्रास होईल, याची विशेष काळजी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले.
या “स्टील स्पॅन्स”च्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *