एमसीसी लिटिल स्टार लीग क्रिकेट स्पर्धा
एमसीसी सांताक्रूझच्या विजयात समर्थ चमकला
मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग क्रिकेट स्पर्धेत (१४ वर्षांखालील) एमसीसी सांताक्रूझने स्पायडर सीसीवर १५ धावांनी विजय मिळवला. त्यात समर्थ चमकला. एमसीसीच्या २०७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पायडर संघ ४० षटकांत ५ बाद १९१ धावाच करू शकला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत एमसीसी सांताक्रूझने दोनशेपार मजल मारली. त्यात समर्थने ७४ चेंडूत ५६ धावा करताना मोलाचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघाकडून सोनाक्षी सोलंकीने १६ धावांत ३ विकेट घेतल्या.
त्यानंतर सोलंकीने (११२ चेंडूत ८३ धावा) फलंदाजीतही छाप पाडली तरी त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. समर्थने ३४ धावांत एक विकेट घेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यानेच सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
एमसीसी सांताक्रूझ – ४० षटकांत ९ बाद २०६(समर्थ ५६(७४), सोनाक्षी सोलंकी ३/१६) वि. स्पायडर सीसी — ४० षटकांत ५ बाद १९१(सोनाक्षी सोलंकी ८३(११२), आकर्षक गुप्ता २/३६). निकाल: एमसीसी सांताक्रूझ १५ धावांनी विजयी. सामनावीर: समर्थ ५६ (७४) आणि १/३४
एमसीसी ठाणे ब – ४० षटकांत ८ बाद १६१(क्रिश शर्मा ५६*(६३), विहान वॅडे २/८) वि. स्पायडर सीसी – २१.२ षटकांत ३ बाद १६२(विराट सिंग ५०(३५), दिशांत फुलोरे १/१५). निकाल: स्पायडर सीसी ७ विकेट राखून विजयी. सामनावीर: हृधान चौहान २/९ आणि ३६(३९).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *