भाषा ही केवळ मानवाला मिळालेली निसर्गाची जादुई देणगी आहे. आपण आपले अतिशय गुंतागुतीचे विचारही अशा भाषेमधून प्रक्षेपित करू शकतो. श्वास घेताना नव्हे तर तो सोडताना आपण आपण त्याचे आवाजात रुपांतर करू शकतो. या आवाजात कंपने कमी जास्त करू शकतो आणि त्यासोबतच त्यात आपली भावना दिसेल असे रूपही देऊ शकतो. खरे तर हे सगळे म्हणजे केवळ हवेतील कंपने आहेत. हीच कंपने माझ्याकडून तुमच्याकडे पोचतात. तुमच्या कानांना स्पर्श करतात. केवळ अशी कंपने तयार करून मी तुम्हाला भाषेचे एक अक्षरही न उच्चारता हसवू किंवा रडवू शकतो. याचे कारण असे की कानांवर पडल्यानंतर ही कंपने तुमच्या मेंदूत शिरतात आणि तेथे त्यांचे रुपांतर विचार आणि शब्दात होते.
जगातील बोल-भाषांचा पसारा अंदाजे सात हजार भाषांचा आहे. या प्रत्येक भाषेमधील कंपनांचे कानावर पडणारे आवाज, त्यांचे शब्द आणि वाक्यरचना करण्याची पद्धत जरी भाषेनुसार बदलत असली तरी त्यांचा प्रभाव मात्र आपल्या विचारांची जडणघडण ठरवीत असतो. जगातील काही भाषा डावीकडून उजवीकडे तर इतर काही भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. आणखीही अनेक प्रकार आहेत. “मानवी मन किती निर्मितीक्षम आणि लवचिक असते हे समजून घ्याचे असेल तर जगातीले भाषांची विविधता आणि त्यांचे सौंदर्य बघावे” असे मानवी आकलन शक्तीचे तज्ञ लेरा बोरोडित्स्की यांचे मत आहे. त्यांच्या मते यामुळेच मानवी मनांनी एक नव्हे तर किमान सात हजार भाषांचे आकलन विश्व तयार करून ठेवले आहे.
निसर्गानी मानवाला दिलेल्या याच क्षमतेच्या आधारावर आज आपण आपल्या कल्पना आता तर क्षणभरात जगभर कुठेही पोचवू शकतो. याचा अर्थ आता ज्ञान हे मनामनातून आणि परिणामकारक पद्धतीने प्रक्षेपित होऊ शकते. “कल्पना करा की एक व्हेल मासा सागरामध्ये ‘एआय’ बद्दल विचार करतो आहे” असे जर मी तुम्हाला सांगितले तर प्रत्यक्षात तुम्ही व्हेल मासा आणि एआय हे दोन्ही बघितले नसतील तरी मासा, पाणी तसेच एआय हे नवे जादुई विज्ञान इतका विचार तुमच्या मनात आलाच असणार.
आपली बोलण्याची भाषा आपल्या विचारांन आकार देऊ शकते का? हा प्राचीन काळापासून चर्चेत असलेला प्रश्न आहे. असे मानले जायचे की दुसरी भाषा येणे हे दुसरा आत्मा असल्यासारखे आहे परंतु काळ बदलत गेला तशी दोन नव्हे तर संवादासाठी अनेक भाषांची गरज पडू लागली. त्याचा बोलबाला वाढला. गुलाबाला कोणतेही नाव दिले तरी त्याच्या सुगंध हीच त्याची ओळख असणार तसेच भाषा कोणतीही असली तरी तिचा कानांवर पडणारा आवाज वास्तवात आनद देऊ शकतो.
एका भाषेत उजवा आणि दावा हे शब्दच नाहीत असे सांगितले तर?
‘तुझ्या शर्टच्या दक्षिण-पश्चिमेला एक मुंगळा दिसतो आहे’ अशी भाषा जेव्हा आपण शिकू आणि आपल्या मायमराठीत डाव्या बाजूला असा त्याचा अर्थ होतो हे आपल्याला माहिती असेल तर काही काळाने ही भाषाही आपल्या ओळखीची होईल. मातृभाषा तर मायेची ऊब आणि आपलेपण जपते…मराठी भाषेचा काल गौरव-दिन होता म्हणून आज हे काहीतरी नवीन टिपण,,,

श्याम तारे

प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *