शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट

दिवंगत अजित पवारांसह ७० जण निर्दोष

मुंबई: महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाकडून करण्यात आला होता आणि राज्यात आता भाजपचंच सरकार असताना शिखर बँक प्रकरणी दिवंगत अजित पवारांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ७० जनांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळाप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितल होतं. पण, अजित पवार उपमुख्यमंत्री बनून शिंदे-फडणवीस महायुती सरकारसोबत येताच पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी कोर्टात नव्याने अर्ज दाखल केला. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील विरोध याचिका रद्द करण्याकरता मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे नव्यानं अर्ज केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *