पाटीदार समाज डोंबिवलीतर्फे
कल्याण: गोमय पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट गाईच्या शेणापासून बनविलेले लाकूड याला मोठी मागणी आली असून अनेक ठिकाणी या प्रकारची होळी ही सोमवारी पेटविण्यात आली. अशा प्रकारची एक भव्य अशी होळी ही डोंबिवली – दावडी येथील पाटीदार भवन हॉलचा आवारात होळी पौर्णिमेला पेटविण्यात आली. अशा प्रकारचा होळीमुळे लाकडाचा वापर होणार नसल्याने खरी पर्यावरण पूरक होळी साजरी होईल. या होळीमुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. गोसेवा आणि गाईचे उत्पादन याला प्रोत्साहन मिळेल. जंगल/वृक्ष तोड कमी होईल हा संदेश पाटीदार समाजाने दिला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *