ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी?
निवडणूक कार्यक्रमाला उशीर का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
कल्याण: ठाणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत येत्या ३१ मार्च ला संपत आहे. अवघे तीस दिवस उरले असताना या बँकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संताप वेक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा माध्यवर्ती बँक ठाणे पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून गणली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून हीं बँक राज्यात नावारूपास आलेली बँक आहे. या बँकेत शेतकऱ्यामधून तसेच गृह निर्माण संस्था, पत संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, शेतकरी सेवा सोसायटी, मंजूर सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले जातात. २१ संचालक या बँकेच्या संचालक मांडळावर निवडले जातात. या संचालकांचा कार्यकाळ ३० मार्च २०२६ रोजी संपत आहे.
कार्यकाळ संपण्यासाठी अवघे ३५ दिवस शिल्लक असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सहकार विभागाने निवडणुकी बाबत नवीन नियमावली केलेली आहे. या नियमाचा फटका बसणार असल्याने विद्यमान संचालक मंडळातील १५ संचालकांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध होणार असल्याने अनेक वर्ष या बँकेत संचालक पदावर असणाऱ्या विद्यमान संचालकांना धक्का मानला जात आहे.
