Month: March 2026

 जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सन्मान मॅरेथॉन’चे आयोजन

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवनदीप फाउंडेशन आणि जीवनदीप वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता “महिला सन्मान मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी, आत्मविश्वास वृद्धीसाठी व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. टिटवाळा येथील पद्मावती रॉयल सोसायटी येथून या मॅरेथॉनची सुरवात होणार असून ३ कि.मी. अंतर पार करून घोटसाई गाव प्रवेशद्वार येथे सांगता होईल. यामध्ये १८ ते ३० वर्षे व ३० वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतात मात्र नाव नोंदणी अनिवार्य आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 91६7५६341२, 9५६13६3133 ००००००

समाजसेविका मंगलाताई अडसूळ स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा शनिवारी

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक ८/११/१४ वर्षाखालील  मुलामुलींच्या स्वतंत्र एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च रोजी…

गुड मॉर्निंग स्पोर्टस् १४ वर्षाखालील गटात चषकाचे मानकरी ठरले.

स्पर्श फाउंडेशन आयोजित स्वर्गीय सामानाधिकारी यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा – २०२६. मुंबई :- भैरवनाथ मंडळाने स्पर्श फाउंडेशनने आयोजित केलेल्या तृतीय श्रेणी पुरुषात विजेतेपद पटकाविले. १४ वर्षा खालील गटात हा मान…

रनर्स क्लॅन फाऊंडेशनकडून दुर्गम भागातील शाळेला मदतीचा हात

क्रीडा स्वास्थ्य आणि समाजसेवा यांचा संगम कल्याण : मॅरेथॉन विश्वात आपल्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट आयोजनाने देशभर नाव कमावणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील ‘रनर्स क्लॅन फाऊंडेशन’ने आपल्या ‘क्रीडा स्वास्थ्य एवं समाजसेवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या जि.प. शाळा, वाडी (शिवमंदिर) या दुर्गम भागातील शाळेला फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा साहित्याची मदत देण्यात आली. फाऊंडेशनच्या सदस्यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर आणि कवायती सादर करत सदस्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्थानिक भागातील उपलब्ध पाना-फुलांपासून स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ पाहुण्यांना देऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे उपस्थित सदस्य भारावून गेले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलाविष्कार शहरातून आपल्याला कोणीतरी भेटायला आले आहे, या भावनेने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गाणी आणि नृत्यांचे सादरीकरण केले.

 माथेरान झाले चकाचक

७८५ श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता अभियान, ६ टन कचऱ्याचे संकलन, पर्यटन वाढीस मदत मुकुंद रांजाणे माथेरान : महाराष्ट्र भुषण थोर निरूपणकार तिथरूप आदरणीय  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त १मार्च रोजी माथेरान शहरात   सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या अत्यावश्यक अभियानासाठी माथेरान मधील सदस्यांसह कर्जत तालुक्यातील कडाव,नसरापूर,चिंचवली,मानिवली, भडवळ, डीकसळ,किरवली येथून जवळपास ६५० श्रीसदस्य दाखल झाले होते.सकाळी आठ वाजता या अभियानास श्रीराम चौकातून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला कार्यक्षम  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, गटनेते शिवाजी शिंदे,उप नगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सचिन दाभेकर, सिताराम कुंभार, किरण पेमारे,सुनील शिंदे,केतन रामाणे,गौरंग वाघेला,सोहेल महापुळे,किशोर मोरे,नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे,रिझवाना शेख, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे,अर्चना भिल्लारे, ऐश्वर्या शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. माथेरानच्या एकूण ५२ किलोमीटर परिसरातील जंगल भागात सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्लास्टिक बाटल्या, वेफर्स ,गुटखा पाकिटे तसेच इतर प्लास्टिकजन्य सुका कचरा यावेळी सदस्यांकडून गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये सुध्दा काही भागातील लोकांची आजही स्वच्छते बाबतीत मानसिकता नसल्याने आजूबाजूला गटारात कचरा टाकला जातो तो सर्व गोळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील गटारे स्वच्छ करून पालापाचोळा,काचेच्या बाटल्या एकत्रित केल्या आहेत.मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाका, पार्किंग या भागात जवळपास ६५ गोणी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.जमा करण्यात आलेला एकूण पाच ते सहा टन कचरा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांमार्फत हातगाडी मधून डंपिंग ग्राउंडवर नेण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या भव्य अभियानाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे सदस्य जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम कचरा नेहमीच पहावयास मिळतो. यातील नैसर्गिक कचरा हा झाडांचा पाला असून कृत्रीम कचरा प्लास्टिक बाटल्या,पिशव्या वगैरे असतो.यासाठी सर्वांनी संकल्प करून यापुढे कापडी पिशव्यांचा वापर केल्यास निश्चितच काहीअंशी का होईना प्लास्टिक मुक्त माथेरान होण्यास सुरुवात होईल. रिझवाना शेख—नगरसेविका माथेरान

 होळी लहान करा पोळी दान करा

महाराष्ट्र अनिस राबवणार पर्यावरण पूरक होळी अभियान अनिल ठाणेकर राज्यभरात ३ मार्च, मंगळवारी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणा मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाण नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी दिली जाते . एका बाजूला समजामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना  अत्यंत पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी ही होळी मध्ये टाकण्या ऐवजी  ज्यांना पुरण पोळी मिळू शकणार नाही अशा कुटुंबाना लोकांनी पोळी दान करून होळीचा सण साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र अनिस मार्फत डॉ हमीद दाभोलकर, प्रा प्रवीण देशमुख, राहुल थोरात, मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, अण्णा कडलसकर, सम्राट हटकर, प्रकाश घादगिने, मुंजाजी कांबळे, मुक्ता दाभोलकर, अशोक कदम, नंदिनी जाधव यांनी केले  आहे . होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडे जाळली जातात. त्या मधून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. तसेच होळीच्या निमीत्ताने वापरल्या जाणा-या अपशाब्दातून अनेक ठिकाणी भांडणे होतात. ह्याला पर्याय म्हणून डॉ नरेंद्र दाभोकारांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेले पर्यावरण पूरक होळीचा उपक्रम वर्षे महाराष्ट्र अंनिस गेली वीस वर्षे  राज्यभर राबवत आहे.पर्यावरण पूरक होळी मध्ये लाकूड जळण्या ऐवजी आजूबाजूचा परिसर साफ करून गोळा केलेला कचरा जाळण्याचा एक पर्याय या निमित्ताने पुढे आलेला आहे तसेच समाजातील हिंसाचार , भ्रष्टाचार , व्यसन अंधश्रद्धा ह्या  वाईट प्रवृत्तींचा पुतळा करून तो जाळण्याचा देखील एक पर्याय समाजात पुढे येताना दिसत आहे .पर्यावरण पूरक होळीला शालेय मुलांच्या मधून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यवरण पूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याची जोड द्यावी असे देखील आवाहन ह्या पत्रकात करण्यात आलेले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी या निमित्ताने महाराष्ट्र अनिस च्या पुढाकाराने होळी लहान करा पोळी दान करा तसेच पर्यावरण पूरक होळी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत .नागरिकांनी त्या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अनिसतर्फे करण्यात आलेले आहे.

लाल बावट्याच्या राजुर लॉंग मार्चची यशस्वी सांगता, कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसह आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय

Unit-4 अनिल ठाणेकर अकोले, किसान सभा व सीटू कामगार संघटना यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेल्या मोर्चाची संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथे २७ फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी सांगता झाली.अर्धवेळ परिचरांना २ हजार रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये वेतनवाढ, भंडारदरा धरणाचे पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी शासकीय योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश, वन जमिनी व घरांच्या तळ जमिनी श्रमिकांच्या नावे करण्यासाठी झालेल्या राज्यस्तरीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी, बांधकाम कामगारांना शस्त्रक्रिये बरोबरच इतर सर्व आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजना मान्य करण्यात आल्याने लॉंग मार्चची यशस्वी सांगता करण्यात आली. माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, अशोक थोरात, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, पदाधिकारी जितेंद्र चोपडे, उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, दीपक लिपणे, धर्मा शिंदे, नवनाथ मोरे, तबरेज शेख यांनी सहभागी होत सहकार्य केले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुरा बर्डे, आदींनी मेहनत घेतली.तीन दिवस ५८ किलोमीटरचा पायी प्रवास करून हा  लॉंग मार्च नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर धडकला होता. लॉन्ग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लॉन्ग मार्चच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आदिवासी विकास मंत्री अशोक  उईके, व विविध खात्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित राहिले होते. वेतन वाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मांडण्याची आवश्यकता होती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यामुळे बैठकीनंतरही लॉंग मार्च सुरूच ठेवण्यात आला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी भेट घेऊन या बाबतचा विषय उपस्थित केला. तसेच त्याच दिवशी सायंकाळी २६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे विषय ठेवण्यात आले. यानुसार आर्थिक तरतूद करत अर्धवेळ  परिचरांना दोन हजार रुपये व प्रस्तावातील अपूर्णता पूर्ण करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये वेतन वाढ जाहीर करण्यात आली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी संघटनेला दिली.  राधाकृष्ण विखे पाटील व दादासाहेब भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या सर्व 18 निर्णयांची माहिती संघटनेला दिली. वृद्ध, अपंग, निराधार यांची मानधन वाढ, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, आदिवासी शेतकरी या सर्वांचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. मान्य मागण्यांच्या  अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निझरणेश्वर मंदिर परिसरात लॉन्ग मार्च स्थगित करण्याची घोषणा केली.

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप

अनिल ठाणेकर अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करा, हे हल्ले इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, संयुक्त राष्ट्राची सनद तसेच सर्व आंतरराष्ट्रीय करार यांना निर्लज्जपणे धाब्यावर बसवून करण्यात आले आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णतः डावलून हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांतून स्पष्ट होते की त्यांचा या चर्चांवर कधीच विश्वास नव्हता. अमेरिका ही एका आक्रमक दबंग शक्तीप्रमाणे वागत असून, सार्वभौम देशांवर मनमानीपणे हल्ले करत आहे. इराणवरील हा हल्ला अलीकडेच व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि क्यूबाला दिलेल्या धमक्यांनंतर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा संपवल्यानंतर तात्काळ इराणवरील हा हल्ला करण्यात आला आहे. भारत सरकारने आपला मैत्रीपूर्ण देश असलेल्या इराणवरील या हल्ल्यांचा ठामपणे निषेध करून तात्काळ युद्धखोर कारवाई थांबवण्याची मागणी केली पाहिजे, असे आवाहन माकपने केले आहे.

ओमान क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सुलक्षण कुलकर्णी यांची नियुक्ती मस्कॅट : आधुनिक ओमान क्रिकेटची व्याख्या करणाऱ्या युगाने एका नवीन अध्यायाला मार्ग दाखवला आहे. दुलीप मेंडिसच्या नेतृत्वाखाली जवळजवळ १४ वर्षांच्या परिवर्तनानंतर, ओमान क्रिकेट संघटनेने राष्ट्रीय संघाची सूत्रे सुलक्षण कुलकर्णी…

 उदय गायकवाड व अविनाश गोडे यांची राष्ट्रीय मास्टर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप निवड स्पर्धा २०२५-२६ मध्ये ठाण्याच्या उदय गायकवाड आणि अविनाश गोडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड मिळवली आहे.…