Month: March 2026

 अंधेरीत संतांची मांदियाळी

अंधेरीत संतांची मांदियाळी पादुकांच्या दर्शनाचा भव्य सोहळा मुंबई : मेराक इव्हेंट्स यांच्या वतीने भक्तांसाठी अत्यंत आध्यात्मिक आणि दुर्मीळ असा ‘युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा’ रविवार, ८ मार्चला अंधेरी (पूर्व) येथील वृंदावन सहनिवास पटांगण, जीवा…

दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार

शहापूर बिबट्या शिकार प्रकरण दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार १५ नखं हस्तगत अविनाश उबाळे ठाणे- शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या  बिबट्याच्या शिकारी प्रकरणी टोळीतील दोन जणांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे.तथापी बिबटयाच्या हत्येप्रकरणी टोळीतील आणखी तीन संशयित आरोपी हे फरार असून हत्या करण्यात आलेल्या बिबटयाची १५ नखं जंगलातून हस्तगत करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे बिबटयांची क्रूरपणे शिकार करुन नंतर मृत बिबट्यांच्या अवयवांची लाखो रुपयांना तस्करी करणारं हे एक भलं मोठं रॅकेट ठाणे जिल्हयात कार्यरत असल्याचा अंदाज या घटनेमुळे आता वर्तविण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात वनकर्मचाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्रातील ढाकणे,चिंध्याचीवाडी,कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला होता.शिकारी टोळीने या बिबट्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन बिबट्याच्या पायाचे पंजे तोडून नखे काढून घेतली होती.अवयवांची तस्करी करण्यासाठी बिबट्याची अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि बिबट्याच्या शिकार प्रकरणी लागलीच शहापूर वनविभागाने गुन्हा दाखल करत वेगाने तपासाची सुरू हलविली असता या घटनेतील दोन संशयित आरोपींना चौवीस तासांच्या आत अटक करण्यात वनविभागाला यश आले.जेरबंद केलेल्या या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी तपास पथकातील वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी केली असता बिबट्याच्या शिकारी मध्ये आणखी तीन जणांचा समावेश असल्याची कबूली पकडलेल्या दोन आरोपींनी दिली.व मृत बिबट्याची नखं जंगलात एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी चौकशी दरम्यान दिली दरम्यान ही माहिती मिळताच हत्या झालेल्या बिबट्याच्या पायांची एकूण १५ नखं जंगलातून तपास पथकातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हस्तगत केली आहेत.दरम्यान बिबट्याच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना १६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांनी  माहिती देताना सांगितले.टोळीतील आणखी तीन फरार झालेल्या आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.फरार झालेल्या आणखी तीन संशयित आरोपींना पकडल्यानंतर बिबट्याच्या हत्येचे खरे कारण आणि तस्करीचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा

उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी दिव्यांग बांधवांना पालिकेत प्रवेश नकारल्याने तणावाचे वातावरण उल्हासनगर : महापालिकेला अनेक वेळा आपल्या विविध मागण्याचे निवेदन देऊनही पालिका या मागण्या…

नाट्य प्रशिक्षण शिबिराला सुरवात

नाट्य प्रशिक्षण शिबिराला सुरवात कल्याण : गुरुवार 5 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि अप्पा जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम

चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम कल्याण : समाजसेवेचा वारसा जपत आणि वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळ मांडा – टिटवाळा यांच्या माध्यमातून भव्य ‘अन्नदान सेवा’ उपक्रमाचे…

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत झोपड्यांविरोधात वाशी विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा.…

कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक  

कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  तिथी नुसार असलेल्या जयंती निमित्त शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन  झालेल्या ऐतिहासिक कल्याण नगरीत जागोजागी छत्रपती शिवाजी…

अल्पसंख्यांक आयोगावर सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करा

अल्पसंख्यांक आयोगावर सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करा दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनची राज्यपालांकडे मागणी कल्याण : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगावर घटनेप्रमाणे सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करण्याची मागणी दि इंडियन…

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने रविवार दिनांक ०८ मार्च रोजी खांदा कॉलनी येथे रायगड…