Month: March 2026

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक  उईके  यांचे प्रतिपादन अलिबाग : (अशोक गायकवाड — आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास हा त्या समाजाचा खरा आत्मा आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करणाऱ्या या समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक  उईके यांनी शनिवारी येथे केले. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासी विकास परिषद’ सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. पेण येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती. मंत्री डॉ.  उईके  पुढे म्हणाले की, “आदिवासी समाज अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि विश्वासू आहे. त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट वाड्या-वस्त्यांवर जाऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग हा या समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण झाला असून, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी, ठाकर आणि कातकरी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आदिवासी वाड्यांमधील मुले अत्यंत जिद्दी आणि कणखर असतात. ‘अमृता आहार’ योजनेच्या माध्यमातून आपण कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहोत. सुधागड-पाली तालुक्यात आदिवासी विभागाचे स्वतंत्र संकुल उभारण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत आहे.” भरत गोगावले यांनी शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची माहिती दिली. ते म्हणाले की, “आदिवासी विभागासाठी २१ हजार कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. दुर्गम भागातील वाड्यांना रस्ते, पाणी आणि सभागृह यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.” कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आदिवासी बांधवांनी लावलेल्या स्टॉल्सना भेट देऊन त्यांच्या हस्तकलेचे कौतुक केले. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना विविध योजनांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या परिषदेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पद्मश्री परशुराम गंगावणे, आदिवासी विकास विभाग चे अप्पर आयुक्त (ठाणे) गोपीचंद कदम आणि प्रकल्प अधिकारी  तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रास्ताविकात विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

 वीज निर्मिती प्रोजेक्टने केले शेतीचे नुकसान 

वीज निर्मिती प्रोजेक्टने केले शेतीचे नुकसान आदिवासी शेतकरी हवालदिल मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने) विज निर्मितीसाठी तालुक्यातील पाटगाव मालेगाव येथे प्रोजेक्टचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात माती भराव केला आहे. या पावसामुळे काही माती  बाजूला असलेल्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतीत गेल्याने भात लागवड करता आली नाही.   लक्ष्मण आलो झुगरे असे आदिवासी शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी अनेक वेळा प्रोजेक्ट मधील अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी व सदरची माती काढून माझी जमीन पूर्ववत करुन देण्यासाठी सांगितले परंतु त्यांनी न ऐकल्याने शेतकऱ्यांने तहसीलदार मुरबाड यांना विनंती करून निवेदन देऊन कळविले आहे,की आमच्या शेतीची नासधूस करुन आम्हाला शेतीचे उत्पन्न घेण्यास अडचण निर्माण केली असल्याचा आरोप संबंधित शेतकरी यांनी केला आहे.  आदिवासी शेतकऱ्याला येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास व त्यांची सुपीक जमीन पूर्ववत करुन न दिल्यास नुकसान ग्रस्त शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी दैनिक बित्तंबातमीशी बोलतांना सांगितले.

 नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक- नितेश राणे

नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक- नितेश राणे ८५ टक्के नुकसानीचा यंत्रणेचा अहवाल कणकवली(प्रतिनिधी)–आंबा काजू आदी फळांवर सिंधुदुर्गचे अर्थकारण अवलंबून असून नुकसानग्रस्त शेतकरी बागायतदारांना राज्य सरकार नुकसान भरपाई देईलच,मात्र इथून पुढे अशी समस्या उद्भवू नये यासाठी बारामती येथील संशोधन संस्था आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या फळ पिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न शासन करील असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिले. या प्रश्नावर आंबा काजू बागायतदार शेतकरीआक्रमक झाले असून येत्या १२ मार्च रोजी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा शेट्टी यांनी नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथे पत्रकार परिषद आयोजित करून या प्रश्नावर शासनाची भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की,आंबा उत्पादक आणि शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे गेल्या ५०-६० वर्षात आंबा उत्पादकांनी सरकारकडे कधीच मदत मागितलेली नाही किंवा नुकसान भरपाई मागितलेली नाही.मागण्याची परिस्थितीही कधीचआलेली नाही. उलट जिल्ह्याचे अर्थकारण चालवण्यामध्ये आंबा -काजू उत्पादकांचा आणि मासेमारी करणाऱ्यांचा खूप मोठा हातभार आहे. आज शेतकरी अडचणीत आहे. राज्य सरकार मार्फत जो आढावा घेण्यात आला त्यावरून या विषयावर मंत्रिमंडळात दोन वेळा चर्चा झाली आपण स्वतःत्याचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचेही या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.या विषयावर आपण सविस्तर बोललोही आहे. आणि आता राज्य शासनाकडे जो अहवाल आला आहे त्या अहवालानुसार निसर्गामुळे प्रामुख्याने निसर्गातील बदलामुळे जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादनांचे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. ‘आंबा काजू बागायतदारांच्या उत्पादकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली असता त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी नुकसान हा विषय आहेच पण त्याही पलीकडे काहींनी या प्रश्नावर कायमस्वरूपी स्वरूपी तोडगा काढण्यासाठी संशोधनात्मक उपाययोजना करता येणे शक्य आहे का याकडे माझे लक्ष वेधले त्यानंतर मी स्वतः काही परदेशी कंपन्या तसेच राज्यातील काही स्वयंसेवी संस्थांशी  संपर्क साधला  आणि या विषयावर अभ्यास सुरू केला बारामती येथील विकास प्रतिष्ठानच्या  काही तज्ञ्  मंडळींशी ही या विषयावर चर्चा केली असता या प्रश्नावर खबरदारीच्या उपायोजना करण्याच्या दृष्टीने मार्ग निघू शकतो हे लक्षात आल्यानंतर यासाठी चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येईल आणि तो जिल्हा नियोजन मंडळातून करणे शक्य होईल यावर आपण निष्कर्षांस आलो आहोत. याबाबत लवकरच कार्यवाही करण्याच्या सूचना आपण संबंधितांना दिल्या आहेत’, असे राणे यांनी स्पष्ट केले. 12 मार्चच्या नियोजित  मोर्चा संबंधी बोलताना राणी म्हणाले या प्रश्नावर कोणी मोर्चा काढावा किंवा न काढावा हा त्यांच्या प्रश्न आहे मात्र या प्रश्नावर शासन पूर्णतः सकारात्मक आहे आंबा काजू बागायतदारांची आपण सतत संवाद करीत आहोत उद्याही आपण देवगड येथील बागायतदारांची चर्चा करणार आहोत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा पश्चिमेतील मातोश्री नगरात नवीन गटार कामाचा शुभारंभ दिवा : दिवा पश्चिमेतील मातोश्री नगर परिसरातील अचला, मातोश्री अपार्टमेंटसह सात ते आठ इमारतींमधील नागरिकांना गटाराच्या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागात योग्य गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचत होते. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी नवीन गटार बांधकामाच्या कामाचे भूमीपूजन आज करण्यात आले. या भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका स्नेहा अमर पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, शाखा प्रमुख अश्विन चौधरी यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन गटार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात दिवा: रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव, स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’

ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’ दिव्यातील बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिवा: दिवा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे स्वतःच्या जागेचा दावा करत असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ३ ते ४ इमारतीं आणि व्यावसायिक गाळ्यांवरील तोडक कारवाई सध्या स्थगित झाली आहे. संबंधित जागा मालकांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेत ठाणे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिवा रेल्वे स्थानकाजवळील जागा १९६२ साली रेल्वेने ताब्यात घेतली असून त्याबदल्यात जागा मालकांना मोबदला देण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तरीही या जागेवर इमारती उभारण्यात आल्याने त्या अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये गणल्या जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून संबंधित इमारतींना नोटीस बजावत त्या १५ दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यानंतर तोडक कारवाई करण्याचे नियोजनही करण्यात आले होते. नोटीस मिळाल्यानंतर रहिवासी आणि जागा मालकांनी रेल्वेला उत्तर सादर केले होते. त्यानंतर रेल्वेच्या मालमत्ता विभागाकडे याबाबत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या इमारती अनधिकृत असल्याचे नमूद करत १५ दिवसांत कारवाई करण्याचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, या निर्णयाविरोधात ऍड. निखिल वाडीकर आणि ऍड. कस्तूर पाटील यांनी ठाणे न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलावर झालेल्या सुनावणीत ठाणे न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे प्रस्तावित तोडक कारवाई तात्पुरती थांबली असून पुढील सुनावणीपर्यंत रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ठाणे: सक्षम अधिकाऱ्याने संपूर्ण चौकशीअंती दिलेले जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवकाळातील फायदे नाकारणाऱ्या आणि त्यांच्या सेवेत अडथळे आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या शासकीय धोरणाच्या विरोधात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्र (ऑफ्रोह) संघटनेतर्फे सोमवार, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे यांनी दिली. यासंदर्भात ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे म्हणाले, जबाबदार अधिकाऱ्याने पूर्ण चौकशी करून दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र हेतूपुरस्सर लबाडीने रद्द करण्यात आली. अशा रद्द झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाने अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २८.४.२५ रोजी नियमित आणि स्थायी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येणार नसल्याचा निर्णय दिला. पण अधिसंख्य पदावर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेवेतील फायदे नाकारत त्यांना अडचणीत आणले जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून संघटनेच्या पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ९ मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जात  प्रमाणपत्र बाबत खोटे आक्षेप घेऊन पदोन्नती साठी पात्र असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती नाकारली जात आहे. याशिवाय सेवकाळातील १०, २० आणि ३० वर्षानंतर मिळणारे आश्र्वासित प्रगती योजनेचे लाभ न देणे, मृत झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना सेवानिवृत्त वेतन नाकारणे, आंतर जिल्हा बदली न देणे, काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतन लाभ नाकारणे,  सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात खाजगी शिक्षण संस्थाकडून  होत असलेली दिरंगाई, आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी हे आंदोलन होणार असल्याचे रोहित तरे यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऑफ्रोहच्या ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष रोहित तरे, ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा निर्मला पाडळकर, सचिव हिरामण सोनावणे, कार्यकारिणी सदस्या प्रिया खापरे, दयानंद कोळी, नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, नंदनवार ,अजय कोळी,प्रकाश कोळी,अर्जुन मेस्त्री,राकेश डोलकर, स्मिता भोईर, रेखा पाटील, राजेंद्र दांडूक, सुरेश नाखवा,चंद्रशेखर ठाणेकर यांनी केले आहे.

शिवजयंतीचे औचित्य साधत फिट अँड फाईन जिम चे मालक आणि मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा विजेते अमेय नेवगे यांनी अभ्युदयनगर मधील माझे माहेर या मुलींसाठी असणाऱ्या संस्थेला आधुनिक व्यायामाचे मशीन देऊन शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली. समाजसेवक महेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पोलीस निरीक्षक शेलकर,नगरसेविका सुप्रिया दळवी, जनसेवक गणेश शिंदे,गोरख कांगणे,माझे माहेरच्या सुचिता लावंड आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला.

शिवजयंतीचे औचित्य साधत फिट अँड फाईन जिम चे मालक आणि मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा विजेते अमेय नेवगे यांनी अभ्युदयनगर मधील माझे माहेर या मुलींसाठी असणाऱ्या संस्थेला आधुनिक व्यायामाचे मशीन देऊन शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली. समाजसेवक महेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पोलीस निरीक्षक शेलकर,नगरसेविका सुप्रिया दळवी, जनसेवक गणेश शिंदे,गोरख कांगणे,माझे माहेरच्या सुचिता लावंड आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला.

श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न रायगड- रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात देवघर गावात स्वयंभू श्री अमृतेश्वराचे प्राचीन, सुबक मंदिर आहे. नुकत्याच  होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ,ज्येष्ठ, महिला मंडळ आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) यांच्या सर्वांच्या सहकार्याने श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने  संपन्न झाला.देवाचे परमभक्त व ग्रामस्थ संदेश महामुणकर व विराज महामुणकर सांगतात की, देवघर या गावाचा उंबरठा फक्त ३३ घरांचा आहे तरी  येथील प्रत्येक कार्यक्रम हा हौसेने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने  गावचे ग्रामस्थ, महिला तसेच तरुण मंडळी पार पाडत असतात.या कार्यक्रमाच्या दिवशी गावातील प्रत्येक ग्रामस्थ आणि मुंबईवरून आलेले चाकरमानी  आपल्या कामातून थोडी उसंत काढून या उत्सवात सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुद्धा ग्रामस्थ व महिला मंडळ देवघर आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) हे एकत्रित येऊन करत असतात. हर हर महादेव व जय बोला जय बोला श्री अमृतेश्वर महाराज की जय या गजरात ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतात. सदर पालखी सोहळ्याला उपस्थित ग्रामस्थ, वरिष्ठ आणि महिला मंडळ, लहान मुले तसेच युवा तरुण मंडळ मुंबईचे उपस्थित कार्यकर्ते विराज महामुणकर, संदेश महामुणकर, संकेत महामुणकर, ऋषिकेश भुवड, सुरज महामुणकर, संकल्प सुर्वे,राहुल शिगवण, समिर भुवड, दीपेश कदम,नीरज महामुणकर, सोहम महामुणकर, धनराज विचारे,स्वप्निल भुवड,सौरभ कदम, विकेश कदम, सनराज शिर्के, अनिकेत शिर्के,अभिषेक महामुणकर,कुणाल शिंदे, शुभम शिर्के,साहिल शिर्के,संकेत महामुणकर, राज महामुणकर. (इंस्टाग्राम नियोजक कुशल महामुणकर व प्रज्वल महामुणकर. देवघर गावचा इंस्टाग्राम आयडी या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

महिला नेतृत्वाला चालना देण्यासाठी ‘गिव्ह टू गेन’ चर्चासत्र मालिका

महिला नेतृत्वाला चालना देण्यासाठी ‘गिव्ह टू गेन’ चर्चासत्र मालिका मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ निमित्त हवार्थ इंडियातर्फे ‘गिव्ह टू गेन’ या संकल्पनेवर आधारित विशेष नेतृत्व चर्चासत्र मालिकेचे आयोजन करण्यात आले.…