रमेश औताडे
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आरोग्य  शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंचरे, वाफगाव प्राथमिक केंद्र वाफगावच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.मेघना जाधव,खेड ता.भाजपचे उपाध्यक्ष दिलीप माशेरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे, खेड.ता.ख.वि.संघाचे संचालक संतोष गोरडे, ॲड.सुहास दौंडकर, प्रा.बाळासाहेब माशेरे, उद्योजक उमेश दौंडकर. भाऊसाहेब फुके, ॲड समीर गोडसे, नीलेश घोडके, समाजसेवक बाबा हजारे, पवना हाॅस्पीटलचे व्यवस्थापक भारत, दांगट आदी मान्यवर कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधायक उपक्रम राबवित असताना पवना हाॅस्पीटल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व स्टाफ यांचे आभार मानले.तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *