मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्यांना मिळणार आता हक्काचं व्यासपीठ. प्रशासकीय कामांतील अडथळे असोत किंवा नागरी समस्या, आता प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा आणि तात्काळ निवारण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मीरा-भाईंदरचे लाडके लोकप्रतिनिधी प्रताप सरनाईक यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरात गुरुवार, १६ एप्रिल रोजी भव्य “लोकदरबार” चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाईंदर पूर्व येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत हा लोकदरबार संपन्न होणार आहे.
