
मती मंद मुलांच्यात कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या मुलांची सहल, नेरळ येथील बेंद्रे वेद ऍग्रो फार्म मध्ये १४ एप्रिलला संपन्न झाली आहे. या सहलीचे नियोजन आणि आयोजन अशी संपूर्ण जबाबदारी ‘जिज्ञासा’ संस्थेने घेतली होती.
‘बेंद्रे फॉर्म’ मधील निसर्ग रम्य वातावरणात मुलानी भरपूर खेळ आणि मस्ती मजा केली. येथील गोशाळा हे मुलांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. गोशाळेचे प्रमुख, योगेश राजपूत यांनी अगदी सोप्या भाषेत गोमातेचे महत्व समजावून सांगितले.गाई पासून मिळणारे, दूध, दही, ताक लोणी आणि तूप यांची चविष्ट ओळख मुलांना मिळाली. शेणाच्या गोवऱ्या, खत गोमूत्र या गोधनाचे महत्व मुलांना सांगितले. तेथे विविध जातीच्या गाईंची, बैलांची ओळख त्यांनी मुलांना करून दिली. मुलानी तेथील वासरांना जवळ घेऊन त्यांच्या वर माया केली. ‘जिज्ञासा’च्या सुमिता दिघे यांनी फॉर्म हाउस मधील विविध प्रकारची झाडे ,फूले, फळे यांची ओळख मुलांना करून दिली.
दिवस भर मुलांबरोबर सुरेंद्र दिघे ,विश्वास संस्थेच्या मुख्याध्यापिक मीना क्षीरसागर, शिक्षक आणि स्वयंसेवक वसुधा मोंडकर , मंगल शिंदे , कार्यकर्त्या शिल्पा कर्णिक व पालक सहभागी झाले होते. या उपक्रमास, बेंद्रे ऍग्रो फार्मचे मालक श्याम बेंद्रे यांचे सुनियोजित सक्रिय सहकार्य लाभले होते.
00000000
