मुंबई / रमेश औताडे
ज्या धर्मात जाती व्यवस्था नाही त्यांना हिंदू जातीचे आरक्षण का देता ? ते तात्काळ थाबवा व हिंदूच्या आरक्षित जातीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी एका पुस्तकाचा दाखला देत एका पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
संविधान सभा सदस्य शिवा राव यांच्या “फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन” या पुस्तकातील संदर्भ असे सूचित करतो की अस्पृश्यतेच्या प्रथेला इतर कोणत्याही धर्माने मान्यता दिली नव्हती, म्हणून अनुसूचित जाती हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माशी संलग्न असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनुसूचीत जात करणाबाबत मूलभूत निकष अस्पृश्यता आहे जी हिंदू धर्मात एक प्रमुख सामाजिक दुष्कृत्य होती. जी फक्त हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे अनुसूचित जातींच्या बाबतीत धर्म दुर्लक्षित करता येणार नाही. ‘ अनुसूचित जाती’ म्हणजे काय हे स्पष्ट करताना केवळ गरिबी किंवा मागासलेपणा हा एकमेव निकष असू शकत नाही.
अस्पृश्यतेमुळे अपंगत्व या वर्गाला अनुसूचित जाती म्हणून गटबद्ध करण्याचा निकष आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या २८ नोव्हेंबर २००२ रोजी च्या निकालपत्रात संविधान सभेने मान्यता दिली की अनुसूचित जाती हिंदू समुदायाचा एक मागासवर्गीय घटक होता. संविधानातील कलम ३४१ आणि ३४२ च्या कलम (२) मध्ये तरतूद केल्याशिवाय राष्ट्रपतींच्या आदेशात सुधारणा करण्याचा कोणताही प्रयत्न किंवा कोणतेही परिपत्रक अथवा राजपत्रक काढता येत नाही असे सेंगर यांनी संदर्भ देत सांगितले.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *