अरविंद जोशी
मिरा -भाईंदर : शिंदे गटातील शिवसेनेच्या एका अधिकाऱ्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर असभ्य टिप्पणी करत आणि त्यांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओवरून सर्व भाजप नगरसेवक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता तसेच मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी स्वतः आमदार नरेंद्र मेहता यांनी पोलीस स्थानकात उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी अर्वांच्य भाषेत बोलताना पत्रकारांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला.
पत्रकारांशी बोलताना आमदार नरेंद्र मेहता मंत्री सरनाईकांना उद्देशून म्हणाले की, मी सर्वस्व गमावले आहे, पण कल्पना करा, जर मी तुम्हाला उघड केले तर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे काय होईल. मंत्री प्रताप सरनाईक निवडणुकीतील पराभवामुळे निराश झाले आहेत, त्यामुळे ते दररोज निराधार आरोप करत आहेत. मंत्री प्रताप सरनाईक हे सर्वात मोठे भ्रष्ट व्यक्ती आहेत आणि भविष्यात मी त्यांचा सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करेन.
एका ऑस्ट्रेलियन महिलेने सरनाईक यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. असे वेगवेगळे आरोप त्यांनी केले.
यासंदर्भात पोलिसांनी व्हिडिओ वायरल केलेल्या लिंकवरून पवार या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
जर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन नेत्यांना वेळेत स्समाजावले नाही, तर मिरा- भाईंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनू शकते. मिरा- भाईंदर शहरातील राजकारण अत्यंत घृणास्पद पातळीवर पोहोचले आहे हे नक्की.
