अण्णा बनसोडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी..
मुंबई -राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेत मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल च्या सर्व जिल्हाध्यक्षांनी होकार दर्शवला आहे.
सुनिल मगरे हे मागील तीस वर्षापासून शैक्षणिक व आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभेवर व सलग दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे त्यांनी मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाढ आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार लढा, OBC विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलनाचे नेतृत्व केले आहे तसेच शैक्षणिक प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. अजितदादांनी राज्यातील राजकारणात धाडसी निर्णय घेऊन वेगळी राजकीय भूमिका घेतली तेव्हापासून सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनिल मगरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे व विचार रूजविण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत बहुमत व विविध जात, धर्म, समूहांचा सहभाग पक्ष कार्यात असणे आवश्यक असतो. आंबेडकरी समाज हा महाराष्ट्रातील मोठी लोकसंख्या व राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असणारा समाज आहे या समाजाचा पाठिंबा हा हमखास सत्तेत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या समाजातील बहुसंख्याने सुशिक्षित असणारा वर्गाचा सकारात्मक दृष्टिकोन निश्चितपणे पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यास मदत ठरेल असा विश्वास यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
तर दादांची शिव- फुले- शाहू आंबेडकरांचे सामाजिक समतेची भूमिका समाजात प्रभावीपणे राबविण्यासाठी परिषदेवरील जागे बाबत सकारात्मक विचार केला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी शिष्टमंडळाला दिलाय.
000000000
‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज नवी मुंबई येथे महिला जनसुनावणी
ठाणे, १७ (जिमाका) : ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी २१ एप्रिलला नवी मुंबई येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
सदर जनसुनावणी नवी मुंबई येथील सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, ९ वा मजला येथे आयोजित करण्यात येणार असून, सकाळी १०.०० वाजल्यापासून प्राथमिक सुनावणी आणि दुपारी १२.०० वाजता मुख्य सुनावणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील विविध अधिकारी, पोलीस अधिकारी, समाजकल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) यांचे प्रतिनिधी या सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व तयारीचे नियोजन केले असून, महिला तक्रारदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी, ठाणे यांनी केले आहे.
000000000
