रमेश औताडे

मुंबई : डोके आणि मान या अवयवाजवळ होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यातील सुमारे ६२ टक्के प्रकरणं ही केवळ मौखिक कर्करोगाची असून ही वाढ एक चिंतेची बाब ठरत आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे प्रसिध्द सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल च्या संचालक डॉ. सेवांती लिमये यांनी दिली.

डोके आणि मान कॅन्सर जागरूकता मोहीम मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दोन मिनिटांची कृती ही मोहीम आहे.

नागरिकांना आरशासमोर दोन मिनिटांत स्वयं तपासणी करून तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास आणि वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये नाकाजवळील सायनस, नाकाची पोकळी, तोंड, घसा आणि स्वरयंत्र या भागांमध्ये होणाऱ्या कर्करोगांना समावेश आहे.

डॉ. सेवांती त्या पुढे सांगतात की, अनेक टर्शरी केअर रुग्णालयांमध्ये निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणं ही हेड अँड नेक कॅन्सरची असतात आणि त्यापैकी ६२ टक्के मौखिक कर्करोगाची असतात.

०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *