मुंबई / रमेश औताडे
टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जगातील नंबर एक एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्स फोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्स फोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. असे गिरीश हड़कर, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स आणि मनकिरन चौहान एमडी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
या भागीदारीबद्दल संजय दत्त, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे एमडी आणि सीओ यांनी सांगितले की, सेल्सफोर्स सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला डेटा, इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांना एकाच सिस्टीममध्ये आणता आले. अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स यांनी सांगितले की, कोणतेही तंत्रज्ञान वापरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ते खरोखर ग्राहकाला अधिक चांगली सेवा देते का? टाटा रियल्टीच्या बाबतीत याचे उत्तर स्पष्ट आहे.
प्रीमियम प्रकल्प आणि ग्राहक-केंद्रित कामासाठी ओळखली जाणारी टीआरआयएल आता आपले कामकाज आणि ग्राहक सेवा आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील टप्प्यात, कंपनी आपल्या कमर्शियल रिअल इस्टेट व्यवसायातही सेल्सफोर्सचा विस्तार करत आहे. तसेच रेसिडेन्शियल विभागात एजंटफोर्स मार्केटिंग आणि डेटा ३6० च्या मदतीने अधिक वैयक्तिकृत सेवा आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देण्यावर भर दिला जात आहे.
