ठाणे: अनेकांच्या चिरकाल स्मरणात राहिलेलं एक नाव म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा त्यावेळचा टेलिफोन ऑपरेटर अंध कर्मचारी अजय भिडे होय. तब्बल 32 वर्ष टेलिफोन ऑपरेटरची सेवा केल्यानंतर भिडे काल निवृत्त झाले. फारशी कुणी दखल घेतली नसली तरी काही संवेदनशील माणसं हमखास तिथे पोहोचली. त्यांच्या निवृत्तीचा सोहळा झाला. हजारो आवाज तोंडपाठ असलेले भिडे फक्त हॅलो म्हटलं की समोरून फोन करणार्‍याचे नाव घेत. आनंद दिघे, डावखरेंसारखे, काही नावाजलेले लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि ठाण्यातल्या अनेक महापालिकेशी संबंधित असलेल्या नागरिकांचे ते आवाज ओळखत. कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अण्णा देशमुख, कृष्णा कोळी, माजी महापौर भाऊ गाढवे, तात्या काजारी, जनादेशचे संपादक कैलास म्हापदी, पत्रकार मधुकर मुळूक, गणेश जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत काल भिडेंच्या निवृत्तीचा सोहळा पार पडला.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *