मदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नांना यश 
मुंबई,: मालाड पूर्व कुरार गाव भागातील संस्कार कॉलेज ते जी. जी. महालकरी मार्ग ह्या नवीन नियोजित १८.३० मी विकास नियोजन रस्त्यातील पहिल्या टप्प्यातील बाधित झोपड्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करून घेण्यासाठी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून रस्त्यातील बाधित झोपडिधारकांना त्याच परिसरात त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न साकार झाले आहे.  या महत्वपूर्ण कामासंबंधी या विभागाचे आमदा, शिवसेना नेते सुनील प्रभू आणि स्थानिक नगरसेवक अजित रावराणे यांनी पालिका प्रशासनाशी केलेला पाठपुराव्यामुळे  १७२ झोपडीधारकांपैकी पहिल्या टप्प्यातील बाधित ५५ झोपडी धारकांना अखेर न्याय मिळाला. त्यांच्या घराच्या चाव्या नुकत्याच मालाड येथील पी पूर्व कार्यालय याठिकाणी आमदार सुनील प्रभू, नगरसेवक अजित रावराणे, प्रभाग समिती अध्यक्ष हैदर अली शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक देण्यात आल्या. ‘हक्काच्या घराची चावी मिळणार आहे आणि त्यांच्या स्वप्नातील घरे त्यांना मिळणार आहेत. सामान्य माणसाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणे, हीच खरी लोकसेवा,’ हे या लोकप्रतिनिधींच्या कार्यातून सिद्ध झाले आहे.
प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ११७ बाधित झोपडीधारकांना त्यांच्या हक्कांची घरे मिळण्याकरिता आणि प्रकल्प यशस्वी होणेबाबत पालिकेच्या स्तरावर प्रयत्न करून लवकरात लवकर मार्गी लागण्याकरीता शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक अजित रावराणे  यांनी म्हटले आहे.
भविष्यात कुरारमधील विकास आराखड्यातील (विकास नियोजन रस्ते) खुले करण्याबाबत पालिका प्रशासन आणि बाधित रहिवासी यांच्याशी समन्वय साधून कुरारगावच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच कटिबद्ध राहीन. कुरार भागाच्या नियोजित विकासासाठी (विकास आराखड्यातील) नियोजित रस्ते महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. या चावी वाटपाच्या कार्यक्रमात पी पूर्व सहाय्यक आयुक्त रुपाली सरमळकर, सहाय्यक अभियंता खरात, अभियंता माने, अभियंता देशमुख, अभियंता सूर्यवंशी आदी पालिका अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *