अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धा
पुणे : चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले.
देशभरातील ३० विद्यापीठांच्या सहभाग असलेल्या या स्पर्धेत एलएम४ मायनस (लाईट मेन कॉक्सलेस फोर) २००० मीटर शर्यतीत अकादमीच्या संघाने दमदार प्रदर्शन केले. विजेत्या संघात योगेश ललित बोरोले, अनिकेत सुरेश कोलते, यशराज पोपट गायकवाड आणि स्वराज आघव यांचा समावेश होता.
खेळाडूंच्या यशामागे राष्ट्रीय रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे प्रशिक्षण व नियोजन महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्यासह मान्यवरांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *