आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा
मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये जेएसडब्ल्यूच्या वेदांश कुशवाहाने आपला संघ सहकारी आयुष वर्माचा चुरशीच्या लढतीत ११-४, १४-१२, १३-१५, ११-८ असा पराभव केला. राऊंड ऑफ ६४ फेरीच्या आणखी एका सामन्यात, अव्वल मानांकित उत्तराखंडच्या अंश त्रिपाठीने अदीव देवैयावर ११-३, १२-१०, ११-४ असा सहज विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला.
निकाल – पुरुष मुख्य ड्रॉ (राऊंड ऑफ ६४): १-अंश त्रिपाठी विजयी वि. अदीव देवैया ११-३, १२-१०, ११-४; वेदांश कुशवाहा विजयी वि. आयुष वर्मा ११-४, १४-१२, १३-१५, ११-८; संकल्प आनंद विजयी वि. मिशाल दारूवाला 11-5, 11-8, 11-8; कुणाल सिंग विजयी वि. अजय देशमुख ११-५, ११-४, ११-६; शाहबाज खान विजयी वि. कृष्ण दरवाडा ११-६, ११-८, ११-४; वेदांत पटेल विजयी वि. दिना करण 11-1, 11-4, 11-1; आर्यमान सिंग विजयी वि. उत्सव सेन११-८, ११-९, ११-८;
प्रदीप मलिक विजयी वि. आदित्य शेट्टी ११-२, ११-२, ११-०; हर्ष राणा विजयी वि. अजिंक्य पाटील 11-3, 11-3, 11-8.
०००००
