मुंबई : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, वझिरा यांच्या वतीने संघातील ज्येष्ठ सभासदांसाठी NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फेस्काम मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
संघाकडे NCMC कार्ड नोंदणीसाठी एकूण २७८ सभासदांची नावे प्राप्त झाली होती. त्यानुसार २५ व २६ मे २०२६ रोजी दोन दिवसीय नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात NCMC टीमचे प्रमोद राय आणि महेश यादव यांनी काम पाहिले. त्यांनी अवघ्या दोन दिवसांत २०० NCMC कार्डांची नोंदणी पूर्ण केली.
सदर शिबिराचे नियोजन आणि आखणी संघाचे कार्यवाह हेमकांत संखे यांनी केली होती. शिबिरादरम्यान दोन्ही दिवस अतिशय शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने कामकाज पार पडले. या उपक्रमासाठी संघाचे सभासद चंद्रशेखर ठाकूर, आनंदकुमार परूळेकर आणि सदाशिव गुरव यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *