कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवाबत्ती सेवे करीता एकूण ३३ हजार ८७० पथदिवे पोल व ४१ हजार ९०७ लाईट बसविण्यात आलेले आहेत. तसेच प्रभागनिहाय कार्यलयीन इमारती, दवाखाने, हॉस्पीटल, आराग्येकेंद्रे इ. आस्थापना इमारती असून त्यामध्ये विविध क्षमतेचे वायरिंग, वातानुकूलित यंत्रे, विद्युत जनरेटर, ट्रान्सफार्मर, उदवाहने कार्यरत आहे, तसेच त्यांची नियमितपणे देखभाल व दुरुस्ती केली जाते.
विभागाकडून सर्व यंत्रणांची दरवर्षी पावसाळयापुर्वी पहाणी, तपासणी करून दुरुस्ती करणेकामी यावर्षी माहे फेब्रुवारी-२०२६ या महिन्यात विभागाकडून पावसाळयापूर्वी प्रभागनिहाय पाहणी व तपासणी मोहिम हाती घेऊन दुरुस्तीची कामे सुरूवात केली होती, त्यानुसार १० प्रभागातील एकूण २६८ नग खराब, सडलेले, जुने, धोकादायक पथदिवे पोल बदली करणेत आलेले आहेत. तसेच १९८ नादुरूस्त फिटींग बॅक्रेट व १२ वितरण कंट्रोल पॅनल बदली करणेत आले आहेत. दुरध्वनी व वायरेलेम यंत्रणा तपासणी करून कार्यरत ठेवण्यात आलेल्या आहेत.
२०२६ मान्सूनपूर्व तपासणी बाबत आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिकेचे विविध प्रभाग कार्यालय, इमारती, दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे येथील विजसंच मांडणी तपासून उचित दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन करीता विभागाचा कम्युनिकेशन प्लान संपर्क क्रमांकासह तयार करणेत आलेला आहे. पावसाळयात कोणतीही विद्युत विषयक दुर्घटना घडु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती विद्युत कार्यकरी अभियंता जितेंद्र शिंदे यांनी दिली.
