आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.
३० मे, दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे. यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय०००००००००
Heading – ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद०००००००००
Heading – ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Slug – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.
३० मे, दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे. यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे. एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ८२९१९२०५०४ या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या ८२९१९२०५०४ या अधिकृत क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तरी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे. एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ८२९१९२०५०४ या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या ८२९१९२०५०४ या अधिकृत क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तरी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *