०००००००
कल्याण : सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील  आयुक्त महोदयांच्या दालनात  लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
तथापि महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून १८ मेपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे   सोमवार १ जून रोजी कल्याण महानगरपालिकेत संपन्न होणारा लोकशाही दिन, ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची वार्षिक निवडणूक- २०२६ची आचारसंहिता शिथिल होईपर्यंत महापालिकेत होणार नाही. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *