कल्याण : रिपब्लब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा चेअरमन, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली आजी माजी कमिटीतर्फे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
या वेळेस सर्व कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे कट्टर सैनिक (पँथर) आनंद नवसागरे, राहुल नवसागरे, युवराज वाटुरे, सुभाष शिरसाट, अरुण शिरसाट, अर्जुन जाधव, अजय रोकडे, सतीश साबळे, अरुण शिरसाट आदी उपस्थित होते. कल्याण डोंबिवलीमधून आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे जाण्यासाठी कल्याण डोंबिवली मधील शेकडो कार्यकर्ते आंबेडकर भवन,दादर येथे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *