ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे आयोजन
ठाणे : सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषविणारे नरेंद्र मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे बुधवारी सकाळी १० वाजता गावदेवी मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त केला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी महाआरती करण्याची सूचना भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार नौपाड्यातील गोखले रोडवरील गांवदेवी मंदिरात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १० वाजता महाआरती करण्यात येणार आहे.
ठाण्याचे ग्रामदेवत असलेल्या श्री गांवदेवी मंदिराला १२५ वर्ष पूर्ण झाली आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गांवदेवी मंदिराच्या माध्यमातून ठाण्याच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाची साक्ष मिळते. या मंदिरात महाआरतीचा गजर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *