सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीग २०१६
मुंबई : ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये (२०३६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सत्य विजया एससीने आय.सी. स्पोर्टिंगचा ४-० असा धुव्वा उडवला.  बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस डी’असिसी हायस्कूल मैदानावर सुरू झालेल्या स्पर्धेत रितेश पेरांब्रा, जोएल डायस, तुषार पुजारी, निर्वाण भट्टने प्रत्येकी एक गोल करत सत्य विजया एससीच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. राधास्वामी एससी आणि विंग्स फुटबॉल अकॅडमी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
निकाल: सत्य विजया एससी ४ (रितेश पेरांब्रा, जोएल डायस, तुषार पुजारी, निर्वाण भट्ट) विजयी वि. आय.सी. स्पोर्टिंग ०. राधास्वामी एससी ० वि. विंग्स फुटबॉल अकॅडमी ०.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *