१५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा
अंतिम फेरीत रिपब्लिकन्स एससीवर विजय
मुंबई, ९ जून: १५ व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेच्या १६ वर्षांखालील मुले गटात डॉन बॉस्को एससी अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम फेरीत त्यांनी रिपब्लिकन्स एससीवर ३-२ विजय असा विजय मिळवला. एएचडब्ल्यूए आयोजित वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुले गटाच्या फायनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यात रॉयडेन कोळी, अर्णव खोत आणि सार्थ हिरामठच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर डॉन बॉस्को एससीने वर्चस्व राखले. मात्र, रिपब्लिकन्स एससीकडून चिंगशुबम हेथोइबा व शुभम शिंदेने गोल करून सामन्यात रंगत आणली.
वरिष्ठ महिला गटात वॉरियर्स एससीला २-० असे हरवत सी व्ह्यू एससीने जेतेपद पटकावले. रेश्मा महाडिकने दोन्ही गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हेटरन्स पुरुष गटाच्या अंतिम फेरीत हॉकी मीरा रोडने मुंबई कस्टम्सवर १-० अशी मात केली. सामन्यातील मॅचविनर गोल मेघराज एस.याने केला.
निकाल (१६ वर्षांखालील मुले – अंतिम सामना): डॉन बॉस्को एससी ३ (रॉयडेन कोळी, अर्णव खोत, सार्थ हिरामठ) विजयी वि. रिपब्लिकन्स एससी २ (चिंगशुबम हेथोइबा, शुभम शिंदे).
वरिष्ठ महिला (अंतिम सामना): सी व्ह्यू एससी २(रेश्मा महाडिक) विजयी वि. वॉरियर्स एससी ०.
व्हेटरन्स पुरुष (अंतिम सामना): हॉकी मीरा रोड १ (मेघराज एस.) विजयी वि. मुंबई कस्टम्स ०.
00000000
