ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील उपनगराचा राजा या भव्य गणेशोत्सवातील गणेशमूर्तीची पाद्यपूजा मोठ्या थाटामाटात, अभूतपूर्व उत्साहात भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सपत्नीक तसेच नगरसेविका ॲड. सीमा शिंदे व किरण शिंदे या दांपत्यांनी केली. मोठ्या संख्येने श्रीगणेश भक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई तील प्रख्यात मूर्तीकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू या ही भव्य मूर्ती साकारणार आहेत. (छाया : योगेश पाडलोसकर)
