राजीव चंदने
मुरबाड :तालुक्यातील आंबेळे बुद्रुक गावचे सुपुत्र आदित्य अभिलाषा धनाजी दळवी यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर आदित्यने इयत्ता दहावीमध्ये ९० टक्के तर बारावी विज्ञान शाखेत ९३ टक्के गुण मिळवले. नीट परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत त्याने कोल्हापूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आणि नुकतेच यशस्वीरित्या एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे.
आदित्यचे वडील आणि आई यांनी लहानपणापासूनच त्याच्यामध्ये परिश्रम, शिस्त आणि स्वकर्तृत्वाची मूल्ये रुजवली. त्याच्या यशामागे कुटुंबाचे प्रोत्साहन, कठोर मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक ठरले. “परिश्रम आणि निष्ठा असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” असा प्रेरणादायी संदेश आदित्यने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला आहे. आदित्यच्या या यशामुळे संपूर्ण आंबेळे बुद्रुक गाव, मुरबाड तालुका आणि दळवी कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  आदित्यच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या भावी वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *