मुरबाड: कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्ग ६१ वर नढई येथिल नविन पेट्रोल पंपास मुरबाड महावितरणने रस्ता ओलांडून दिलेली विज जोडणी ही बेकायदेशीर असून वाहन चालकांच्या जिवितास धोका निर्माण करणारी असून ही वीज जोडणी तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग व मुरबाड महावितरण कडे केली आहे.
महामार्गाच्या हद्दीत विज जोडणी करताना महामार्ग विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. या जोडणीमुळे महामार्गावर काही अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार असल्याचा प्रश्न समोर येत असून मुरबाड महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्यामुळे हे शक्य झाले असल्याची चर्चा होत आहे. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, राष्ट्रीय महामार्गाची परवानगी न घेता या कामास मंजुरी देणाऱ्या मुरबाड महावितरणचे तत्कालीन उप अभियंता देवके व शाखा अभियंता जाधव यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी पत्रकार दिलीप पवार यांनी मुख्य अभियंता काटकर यांच्याकडे केली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही विज जोडणी तात्काळ काढून टाकावी अन्यथा महामार्गाच्या विरोधात उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.
