भरत गोगावले यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन
अशोक गायकवाड
राजगड—कर्जत :  कर्जत शहरात उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी गोगावले यांनी कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक भरत गोगावले यांनी केले. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील नवीन ‘श्रीराम पुलाचा’ लोकार्पण सोहळा कर्जत येथे झाले. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे,तसेच भाजपचे राजेश भगत,शरद लाड,जिल्हा उप प्रमुख भाई गायकर, विजय पाटील, शिवराम बदे, यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता राहुल देवांग आदी प्रमुख उपस्थित होते. पुलामुळे आता अवजड वाहनांची कोंडी फुटणार असून कर्जत शहर व तालुक्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल व सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत यांच्या वतीने करण्यात आले होते. पुलाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या शुभहस्ते आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा पूल इंग्रजकालीन आणि जुना झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला व वाहनांच्या संख्येला अपुरा पडत होता. शहरात जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे. पावसाळ्यात तर पर्यटकांची गर्दी वाढल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागत असत. हीच कोंडी आणि स्थानिक वाहनचालक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी या नवीन पुलासाठी अथक परिश्रम घेतले. पावसामुळे पुलाचे अंतिम रंगकाम आणि विद्युत दिव्यांचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. मात्र पुलाच्या सौंदर्यापेक्षा पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे आणि त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असे थेट आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करून लोकार्पण निश्चित केले.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *