डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघड
कल्याण : एमआयडीसी परिसरात मुख्य गटारातून ओव्हरफ्लो होऊन निळ्या रंगाचं रासायनिक पाणी थेट रस्त्यावर वाहताना आढळलं. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा कल्याण जिल्हा सचिव आशुतोष सिंह यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा सचिव दुर्गेश चव्हाण, भाजयुमो जिल्हा सचिव अभिषेक यादव उपस्थित होते.
