ठाणे : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘रुस्तमजी आजियानो ए बी सी हौसिंग सोसायटी’च्या दरबार हॉलमध्ये सहकार सप्ताह दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे उपनिबंधक को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे अध्यक्ष सीताराम राणे तसेच सदस्य व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे डॉ.किशोर गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोसायटीच्या समिती सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर ॲड.विशाल निंबाळकर यांनी प्रास्ताविक करत उपस्थित सदस्य व रहिवाशांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच सोसायटीचे सचिव  बाळासाहेब निंबाळकर यांनीही प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी सीताराम राणे आणि डॉ.किशोर गाडे यांच्या हस्ते सोसायटीचे सचिव बाळासाहेब निंबाळकर यांना उत्कृष्ट कार्य करणारी हौसिंग सोसायटी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना उपस्थित रहिवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात समितीचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमास गोयल, वर्मा, गोयंका बंधू, सोसायटीचे मॅनेजर ईश्वरजी, कर्मचारी, सन्माननीय सदस्य तसेच बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  सीताराम राणे आणि डॉ. किशोर गाडे यांनी आपल्या मनोगतात ‘रुस्तमजी आजियानो ए बी सी हौसिंग सोसायटी’च्या उत्कृष्ट कार्यपद्धती, व्यवस्थापन आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. तसेच सोसायटीने भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श निर्माण करावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *