अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने
दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ३४० सातारकर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेवक ॲड. आदेश भगत, नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे तसेच अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला सातारा जिल्हा रहिवासी संघाचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने माता- भगिनी उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सातारकर बांधव, विद्यार्थी, माता- भगिनी, पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही समाजहिताचे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
संस्थापक राम पवार, खजिनदार राजेंद्र शेलार, सह सचिव आनंद कोळेकर, संपर्क प्रमुख रविंद्र शेजवळ, दिनकर सकपाळ, अध्यक्ष काशिनाथ साळुंखे, कार्याध्यक्ष आदित्य कदम, उपाध्यक्ष नितीन काळे, निलेश पवार, संघटक संतोष शेजवळ, सचिव रामचंद्र पवार, उप कार्याध्यक्ष तानाजी पवार, सह खजिनदार मच्छिंद्र सकपाळ, मा. अध्यक्ष/ सल्लागार संतोष फणसे, सल्लागार शंकर सुर्यवंशी, साहेबराव पिंपळे, सुहास गायकवाड, रघुनाथ यादव, सदस्य चेतन पवार, आकाश वाघ, सुर्यकांत मोरे, विलास जाधव आदी सर्व सभासद आणि सातारा जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहरातील नागरिक तेव्हा उपस्थित होते.
00000000
