विमानतळ कर्मचारी आणि तृतीयपंथीयांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप
मुंबई दि. (प्रतिनिधी): प्रयास एक कोशिश या संस्थेच्या सहकार्याने दि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तियारा यांनी ‘अन्नपूर्णा : हॅप्पी हंड्रेड’ हा प्रकल्प हाती घेतला आणि विमानतळ कर्मचारी तसेच तृतीयपंथीयांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप नुकतेच अंधेरी येथे करण्यात आले. समाजातील असंघटित क्षेत्रातील कर्मचारी तसेच तृतीयपंथीयांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. ही मंडळी तृतीयपंथी झाली हा काही त्यांचा दोष नाही परंतु त्यांची सातत्याने होत असलेली हेटाळणी टाळून एका कर्तव्य भावनेने इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तियारा यांनी ‘प्रयास:एक कोशिश’ या स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थेच्या सहकार्याने यंदाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमानतळ कर्मचारी व तृतीयपंथीयांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सुमारे ३३ विमानतळ कर्मचाऱ्यांनी तसेच तृतीयपंथीयांनी या सेवेचा लाभ घेतला. आराधना लुनिया, पीपी कुंती गाला, काजल बराच, केजल जसानी, नेहा मिस्त्री, निलोनी मेहता, स्मीता दोशी, मिनू लालाजी, प्रीति सेलारकर, कश्मिरा शुक्ला, लता भांखरिया, निशा कपूर, नेहा संजीव शाह यांनी या गरजवंतांना केलेल्या अन्नधान्याच्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून आले ज्यामुळे या समाजसेवी कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी ऊर्जा मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *