अनिल ठाणेकर
मुंबई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध व त्याचा भारतावर होणारा परिणाम’ या विषयावर सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत टिळक भवन ऑडिटोरियम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुख्यालय, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे.
या चर्चासत्रात जागतिक युद्धनीती व संरक्षणविषयक अभ्यासक तसेच ‘फोर्स’ मासिकाचे संपादक प्रवीण साहनी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उतगी हे जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, त्याचे जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा तसेच भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितांवर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा या चर्चासत्रात घेतला जाणार असून, विविध क्षेत्रांतील अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *