कल्याण : कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या ‘कबड्डी दिन’ सोहळ्यात ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार भाई जगताप आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध पदाधिकारी आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
