कल्याण : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रविवारी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात महाआरती करत आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा जाहीर निषेध केला. या आरतीसाठी ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी देखील उपस्थित राहून श्री रामाची आरती केली. आरतीला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, शहर प्रमुख कुणाल ढापरे आणि शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच डोंबिवली मधील नागरिकांनी देखील आरती केली. दरम्यान आरती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुरुनाथ खोत आणि मामा पगारे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *