मुंबई – विक्रोळी कन्नमवार नगर जनता मार्केट येथील गेटवेल सर्जिकल येथे दिशा वेल्फेअर ग्रुप, सामाजिक संस्था मुंबई(रजि.)आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रविवार २ ऑगस्टला सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत संपन्न झाले.या शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरामध्ये आरोग्य तपासणी व सल्ला, मोफत औषधे, नेत्र तपासणी व चष्मा वाटप,ब्लड शुगर, ब्लड प्रेशर,बी.एम.आय. तपासणी इ. तपासण्यांचा लाभ नागरिकांनी घेतला.
दिशा वेल्फेअर ग्रुपचे हे २५ वे आरोग्य शिबीर होते.या प्रसंगी दिशा वेल्फेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बेरिसेट्टी,मनराज प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक मनोज राजन नाथानी, माजी नगरसेवक व बेस्ट समिती सदस्य उपेंद्र सावंत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी विधानसभा संघटक शंकर ऊर्फ नाना ढमाले, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुका अध्यक्ष संजय येलवे, सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे, सदस्य महेंद्र भोईटे,लायन्स क्लब चेंबूर चे हिरेन पांचाल व सविता पांचाल आदि मान्यवर उपस्थित होते.या शिबीराचा १७५ नागरिकांनी लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी दिशा वेल्फेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बैरीसेट्टी,सचिव प्रकाश पालव, खजिनदार छाया सावंत, उपाध्यक्ष भगवान कुर्ले,शरद रावले, सुरेश पांचाल, शीतल जाधव, रवींद्र वाघमारे आदींनी बरीच मेहनत घेतली होती.
