राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने
राजेंद्र साळसकर
मुंबई -येत्या ९ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने,गिरणी कामगारांची सालाबाद प्रमाणे, ग्रँडरोड नाना चौक,अग्नीशमन दलाजवळून,गवालिया टॅंक मैदानावरील हुतात्मा स्मारकापर्यंत मूकमिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मूक मिरवणुकीचे नेतृत्व महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिनभाऊ अहिर आणि संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते करतील. संघटनेचे अन्य पदाधिकारी खजिनदार निवृती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे आदी मान्यवर मूक मिरवणुकीच्या अग्रभागी असतील! संघटनेचे संघटन सचिव,तसेच सेवादल,महिला फ्रंट या भूक मिरवणुकीत सहभागी होतील.
राष्ट्रभक्तीचा हा उपक्रम गेली अनेक वर्षे रा.मि.म.संघाद्वारे आयोजिला  जात आहे,तरी कामगार वर्गाने मोठ्या संख्येने नाना चौक, अग्नीशमनदल येथून निघणा-या मूकमिरवणुकीत सहभागी होऊन, राष्ट्रभक्तीचे कर्तव्य पार पाडावे,असे आवाहन राष्ट्रीय मिल मजूदर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगार वर्गाला केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *