कल्याण :  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मिरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अविनाश जाधव,जिल्हा अध्यक्ष विधा वेखंडे, माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सोमनाथ मिरकुटे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करतात, तसेच ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हि होते, परंतु मध्यांतरी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन  तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष नेमण्यात आले. सोमनाथ मिरकुटे हे सुद्धा जिल्हा अध्यक्ष शर्यती मध्ये होते, परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना डावलले, त्यामुळे ते नाराज होते. अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत, देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे विचार व नेतृत्व स्विकारून त्यांच्या पक्षाचे काम करण्याचे ठरविले व पक्ष प्रवेश केला.
त्यांच्यासोबत नवनाथ वाघे, मंगेश जाधव, विशाल ठाकरे, रोहिदास पवार, प्रसाद पाटोळे, बळीराम मिरकुटे, बबन मिरकुटे, रामचंद्र बांधणे, सचिन मोहफे, पंढरीनाथ बांधणे, सुरेश कारले, रवि जाधव,रामा रोहणे, काशिनाथ मिरकुटे, भास्कर भोईर,अभय लोणे, कल्पेश निचीते, निशांत दिनकर आदींनी प्रवेश केला आहे. सोमनाथ मिरकुटे यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत होईल असे वाटते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *