महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करत नोंदवला निषेध
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना गुंगी गुडिया असा अपशब्द काँग्रेस पक्षाच्या सोशल हॅंडलवर करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घुसून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून माफीनामा आला नसल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने हाताला काळ्या फिती लावून आणि संविधान हातात घेऊन जोरदार मूक आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आमदार सना मलिक-शेख, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *