अनिल ठाणेकर
ठाणे-निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान राबविण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या अभियानांतर्गत डी. जी. तटकरे हायस्कूल (तळा), अशोक ल. लोखंडे विद्यामंदिर (पिटसई), बोरली हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल (म्हसळा), डी. जी. हायस्कूल तसेच डॉ. ए. आर. उंद्रे इंग्लिश हायस्कूल यांसह मुरुड, नांदगाव, नागाव, अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात येत आहे.
संपूर्ण कोकण विभागात ५० लाख मोफत वह्यांचे वितरण करण्याचे नियोजन असून, लाखो विद्यार्थ्यांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान शैक्षणिक संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे  निलेश भगवान सांबरे यांनी सांगितले.जिजाऊच्या माध्यमातून  निलेश भगवान सांबरे यांनी कोकणात शिक्षणकेंद्रित सामाजिक चळवळ उभी केली आहे. १० मोफत सीबीएसई शाळा, ५० मोफत अभ्यासिका, ४० मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, ३६ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे तसेच विविध कौशल्य विकास उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.या शैक्षणिक उपक्रमांतून आजपर्यंत हजारो युवक युवती पोलीस, सैन्य तसेच विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत झाले आहेत. शिक्षण हीच सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून  निलेश भगवान सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची शैक्षणिक चळवळ सातत्याने विस्तारत असून, ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान हा त्या व्यापक सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *