सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीतील मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची जबाबदारी आता या सगळ्यांनी स्वीकारली आहे. जिल्हा कायमस्वरूपी कुपोषण मुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या संकल्पनेतून ही ‘बालक दत्तक योजना’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीव्र कुपोषित श्याम श्रेणीतील २२ बालकांना प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी आणि सदस्यांनी दत्तक घेतले आहे
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी अलिकडेच जिल्हा परिषदेला भेट दिली होती या भेटीच्या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील कुपोषणाचा विषय उपस्थित करत जिल्हा पोषण मुक्त करावा अशा सूचना जि. प. प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्यांच्या संयुक्त बैठकीत केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही या समस्येवर चिंता व्यक्त केली होती
दत्तक घेणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी:
प्रमोद कामत – अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष-तुकाराम साईल अभिराज राणे (आमदार निलेश राणे यांचे सुपुत्र ) नारकर – सभापती, महिला व बालकल्याण समिती -प्रितेश राऊळ सभापती, शिक्षण व आरोग्य समिती – वेंगुर्ला संतोष साटविलकर – सभापती, वित्त व बांधकाम समिती रुहिता तांबे – सभापती, समाजकल्याण समिती – कणकवली केशव नारकर- सदस्य, दिपलक्ष्मी पडते प्रिमेशवाघ – गटविकास अधिकारी, वैभववाडी जयप्रकाश परब- उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद शितल पुंड – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिद्धेश रावराणे- सभापती, पंचायत समिती वैभववाडी
एकूण २२ मुले सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, देवगड, कणकवली, कसाल, वेंगुर्ला आदी तालुक्यातील अंगणवाड्यांमधून दत्तक घेण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे दत्तक घेतलेल्या मुलांना नियमित पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि वजन-उंची वाढीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे कुपोषण निर्मूलनाच्या लढ्याला बळ मिळाले असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
