बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग
मुंबई, २४ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई लेगमध्ये सोमवारी १३ वर्षांखालील मुलांच्या गटातील सामन्यात रायगड क्रॉसर्सने पुणे ग्लोबल स्पोर्ट्सचा ६३-३२ असा मोठ्या फरकाने पराभव केला. प्रमुख खेळाडू सलमान शेखने (३१ गुण) सातत्याने बास्केट करत विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ही लीग नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन’ (एनएमडीबीए) आणि महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल असोसिएशनच्या (एमएसबीए) संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
सलमानच्या कामगिरीला त्याच्या सहकाऱ्यांचीही चांगली साथ मिळाली; यामध्ये इब्राहिम के. (१२ गुण) आणि जव्वीर लखोटिया (११ गुण) यांनी मोलाचे योगदान दिले. पुणे ग्लोबल स्पोर्ट्सकडून उमर कुरेशी (१३ गुण) आणि वेदांत कदमने (११ गुण) चमक दाखवली. त्यानंतर, मुलींच्या गटातील सामन्यात एनडी भाईंदरने रायगड क्रॉसर्स’चा ३५-३० असा निसटता पराभव केला.
निकाल (मुले): ठाणे प्रोनेट्स (ज्ञान २६, जनाव के. १३, परम चौहान १०) विजयी वि. साऊथ मुंबई मॅनियाक्स (विशॉन लासार्डो ९, हमझा बागलकोटे ८) यांचा ६१-३३ (मध्यंतर: २२-१४).
रायगड क्रॉसर्स (सलमान शेख ३१, इब्राहिम के. १२, जव्वीर लखोटिया ११) विजयी वि. पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (उमर कुरेशी १३, वेदांत कदम ११) ६३-३२ (मध्यंतर: २५-२१).
मुली: एनडी भाईंदर (सायशा चौधरी ११, ईवा मोरे ८) विजयी वि. रायगड क्रॉसर्स (आदिया अवधानी ८, वाणी मेनन ६) ३५-३० (मध्यंतर: १४-८).
